शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी पर्यटन महोत्सवासाठी खास कक्ष : बबन साळगावकर ,कार्यक्रमांची मिळणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:50 IST

सावंतवाडी : यावर्षी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना वेगळेपण दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सावंतवाडी : यावर्षी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना वेगळेपण दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. संयुक्त दशावतार, सुरमयी वाद्यवृंद, असे दर्जेदार कार्यक्रम नागरिंकांच्या पसंतीला उतरणार असून, महोत्सवाबाबत यावर्षी प्रथमच खास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातूनच महोत्सवाचे नियोजन होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

सावंतवाडीत होणाºया पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पालिकेत खास कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य व क्रीडा सभापती आनंद नेवगी, नगरसेवक बाबू कुडतरकर, मनोज नाईक, अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, सुरेंद्र बांदेकर, दीपाली भालेकर, दीपाली सावंत, भारती मोरे उपस्थित होते.साळगावकर म्हणाले, गेली ११ वर्ष पर्यटन महोत्सव सुरू आहे.

यामध्ये शहरवासियांचा मोठा सहभाग असतो. नागरिकांच्या समस्या तसेच त्यांना महोत्सवाबाबत माहिती हवी असल्यास ती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी खास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातून सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल. तेथे एक कर्मचारी महोत्सव होईपर्यंत थांबेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महोत्सवात १९८ स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवार पासून महोत्सवासाठी स्टॉल बुकिंग सुरू करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.स्टॉलच्या विक्रीला प्रचंड प्रतिसादनगरपालिकेने १९८ स्टॉल विक्रीसाठी काढले होते. त्यातील जवळपास दोन दिवसांत १३० स्टॉल विकले गेले आहेत. मुंबई, पुणे, तसेच अन्य भागातूनही स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवाच्या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात नागरिक स्टॉलला तसेच महोत्सवाला भेटी देत असतात. त्यामुळेच हा प्रतिसाद मिळतो, असे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले.